An IIT Bombay study using satellite data shows rising greenhouse gas levels over Delhi and Mumbai and also identifies emission hotspots in these cities.
Deep-dive
भारताच्या २०३० साठीच्या अक्षय ऊर्जा जनादेशातील उद्दिष्टांच्या पूर्तीचे मार्ग धुंडाळताना संशोधकांनी अतिशय सूक्ष्म स्तरावर काम करणारे वीज निर्मिती व ग्रिड प्रचालन मॉडेल विकसित केले. प्रादेशिक समन्वय आणि लवचिक अनुपालन यंत्रणा महत्त्वपूर्ण असल्याचे या अभ्यासामध्ये दिसून आले, शिवाय निर्धारित ऊर्जा साठवणूक आणि टप्प्याटप्प्याने कोळश्याचा वापर कमी करणे देखील महत्त्वाचे आहे, यामुळे देशात अक्षय उर्जेचा वापर वाढवण्यासाठी लवचिक, परवडण्याजोगा आणि विश्वासार्ह मार्ग मिळू शकेल.
Article Subtitle:
माइक्रोफायबर तयार होत असतानाच त्यांच्यावर नॅनोपार्टिकल्सचा लेप चढवण्याची आयआयटी मुंबईची पद्धत एकसमान आवरण आणि चांगली कार्यक्षमता सुनिश्चित करते.
१९७५ ते २०१४ या कालखंडातील माहितीच्या विश्लेषणातून आयआयटी मुंबई आणि हैदराबाद विद्यापीठातील संशोधकांनी कृषी क्षेत्रातील गेल्या ४० वर्षातील तीन टप्प्यांमधील बदलांचा मागोवा घेतला आणि त्यात असे दिसून आले की भारतातील अर्ध-शुष्क उष्णकटिबंधातील कृषी उत्पादनक्षमता शेतजमिनीच्या आकारापेक्षा आवश्यक संसाधनाची उपलब्धता, पत किंवा कर्ज आणि बाजारपेठा या घटकांवर अवलंबून आहे.
संगणक करत असलेल्या दूरस्थ प्रतिमांचे विश्लेषण आणि बोली भाषेत दिलेल्या सूचना यांच्यामधील दुवा बनले आयआयटी मुंबईचे नवीन AMVG मॉडेल.
आयआयटी मुंबई येथील संशोधकांनी विकेंद्रित वाहतूक नियंत्रण प्राणलींचे परीक्षण करण्यासाठी नेटवर्क सिद्धांतावर आधारित कार्यक्षम संगणन करणारी गणितीय पद्धत प्रस्तावित केली.
सूक्ष्मजंतूंवरील प्रयोगांतून संशोधकांनी प्रयोगशाळेमध्ये उत्क्रांतीची नक्कल घडवून आणली आणि त्यांना किंचित वेगळ्या शर्करा देऊन त्यांच्या अनुकूलनात होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला.
अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.
हवामान अंदाज, उपग्रहाद्वारे मिळालेली मृदा आर्द्रतेची माहिती आणि संगणकीय प्रतिमान यांचा वापर करून संशोधकांनी जिल्हा-उपजिल्हा पातळीवर कार्यक्षम जलसिंचन व्यवस्थापन पद्धती विकसित केली.