Health
२०१३ मध्ये ५० हून अधिक अर्भके अट्टपडीमध्ये मरण पावली. केरळ मधील पालक्काड जिल्ह्यातील एक संरक्षित भाग म्हणून याची ओळख आहे. ह्या घटनेने आणि त्यानंतरच्या काही वर्षात झालेल्या मृत्यूंनी इथे राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या आरोग्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. बालमृत्यूदर आणि कुपोषणासारख्या प्राथमिक आरोग्य समस्यांचे वाढलेले प्रमाण याला कारणीभूत होते.
नव्याने एकाधिकार मिळालेल्या स्वदेशी सीएआर टी-पेशी तंत्रज्ञानामुळे भारतातील रूग्णांना कर्करोगाचा उपचार घेणे आता आवाक्यात
पार्किनसन्स डिझिझ रुग्णांमध्ये दिसणाऱ्या प्रथिनांचे पुंजके तयार होण्यास कारणीभूत असणाऱ्या रेण्वीय घटना संशोधकांनी शोधल्या
पारकिन्सन्स डिझिझ हा चेतासंस्थेचा एक विकार आहे, ज्यात शारीरीक हालचालींवर नियंत्रण रहात नाही, स्मृतीभ्रंश होतो व हातपाय ताठरतात. आपाल्या मेंदूतील चेतापेशींमधल्या ऍल्फा-सायन्यूक्लीन नावाच्या एका प्रथिनाचे तंतुमय पुंजके तयार झाल्यामुळे हा विकार होतो. मात्र हे पुंजके कशामुळे होतात हे मात्र अजूनही गूढ आहे व ते उलगडण्याच्या प्रयत्नात अनेक संशोधक गुंतलेले आहेत.
मायकोबॅक्टीरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा क्षयरोग जगात मृत्युचे एक प्रमुख कारण आहे. २०१७ साली जगभरात सुमारे १० दशलक्ष लोकांना क्षयरोग झाला आणि त्यापैकी १.६ दशलक्ष रुग्ण दगावले.
माती सुपीक करणारे स्यूडोमोनास जीवाणू, कीटकनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या कार्बेरिलचे विघटन करण्यासही सक्षम असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथील संशोधकांनी 'आहार आणि उपास' यादरम्यान घडणाऱ्या उलथापालथीमध्ये ऊर्जा निर्मितीचे संतुलन राखण्यासाठी सूक्ष्मआरएनए पेशींना कशी मदत करतात ते शोधून काढले आहे.