अनेक अणू एकत्र येऊन रेणू तयार होताना अणूंची त्या रेणूमधली मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने होऊन त्याच्या वेगळ्या रचना तयार होऊ शकतात. अश्या रचनांना समसूत्री(आयसोमर/isomer) म्हणतात. काही समसूत्रींतील अणूंच्या रचना एकमेकांचे आरशातले प्रतिबिंब असतात. जसे दोन हात एकमेकांवर ठेवल्यास तंतोतंत जुळत नाहीत, तश्याच ह्या रचना एकमेकांवर ठेवल्यास जुळत नाहीत. अशा रेणूंना हस्तसम (कायरल/ chiral) रेणू म्हणतात. हस्तसम रेणूची एक रचना औषधी असू शकते तर दुसरी शरीराला हानिकारक. पेनिसिलिनचा रेणू याचे उत्तम उदाहरण आहे.
आयआयटी मुंबईद्वारे विकसित नवीन डीप-लर्निंग फ्रेमवर्क SpADANet (स्पाडानेट) मर्यादित लेबल्स वापरूनही अनेक चक्रीवादळांमधील संरचनात्मक नुकसान अधिक अचूकपणे वर्गीकृत करू शकते.
Mumbai/