शहरातील प्रदूषणाबाबत बातम्या सतत येत असतात, पण आपल्या घरातल्या तेवढ्याच धोकादायक प्रदूषणाकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. चुलीवर स्वयंपाक, धूम्रपान, केरोसीनच्या शेगड्यांचा वापर इ. क्रियांमुळे घरात प्रदूषण होते. जॉन हॉप्किन्स स्कूल ऑफ मेडिसिन, यूएसए आणि बायरमजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (बी. जे. मेडिकल कॉलेज), पुणे येथील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात घरातील वायू प्रदूषणाचा क्षयरोगावर काय परिणाम होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
आयआयटी मुंबईद्वारे विकसित नवीन डीप-लर्निंग फ्रेमवर्क SpADANet (स्पाडानेट) मर्यादित लेबल्स वापरूनही अनेक चक्रीवादळांमधील संरचनात्मक नुकसान अधिक अचूकपणे वर्गीकृत करू शकते.
Mumbai/