सापाच्या शरीरातून प्रवास करणाऱ्या एका साध्या बलाने S-स्टार्ट गतीसारख्या क्लिष्ट हालचालीची हुबेहूब प्रतिकृती तयार करता येते हे दाखवणारे संगणकीय प्रतिरूप तयार करून संशोधकांनी S-स्टार्ट गतीवर अधिक प्रकाश टाकला आणि उत्क्रांतीशी संबंध सूचित केला.
Science
गर्भारपणात होणाऱ्या वायू प्रदूषणाचा अकाली प्रसूती आणि कमी वजन असलेल्या बाळाच्या जन्माशी थेट संबंध असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. हा धोका संपूर्ण भारतात असून, उत्तर भागांमध्ये अधिक आहे.
कोलाजेनमुळे स्वादुपिंडात संप्रेरकांच्या गुठळ्या होण्याचा वेग वाढतो, हे यापूर्वी माहित नसलेले मधुमेहाचे कारण उघडकीस आणून आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी नवीन संभाव्य औषधनिर्मितीचा वेध घेतला.
तिरक्या पृष्ठभागावरील वाळलेले रक्ताचे थेंब व त्यातील भेगा अभ्यासून थेंब किती वेगाने व कुठल्या कोनात आदळला यासारखी माहिती मिळवली जाऊ शकते असे आयआयटी मुंबई येथील संशोधनात आढळले.
जैवसामग्री एकजीव नसल्यामुळे त्यात तयार झालेले ताण क्षेत्र (स्ट्रेन फील्ड) पेशींची पंक्तीरचना कशा प्रकारे प्रभावित करते याचे आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी केलेले संशोधन निरोगी व व्याधीग्रस्त स्थितीतील आणि ऊती अभियांत्रिकीमधील पेशींचे वर्तन कसे असते यावर नवीन प्रकाश टाकते.
लायगो-व्हर्गो-काग्रा गरूत्वीय लहरी डिटेक्टरच्या निरीक्षण सत्रांतील गरूत्वीय लहरी घटनांमध्ये भारताचे ॲस्ट्रोसॅट-सीझेडटीआय उपकरण वापरून संशोधक घेत आहेत गरूत्वीय लहरी स्रोतांमधून आलेल्या उच्च-ऊर्जा विद्युत-चुंबकीय लहरींचा शोध
कार्य-आधारित चाचण्यांमधून असे दिसून येते की पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) मुळे महिलांच्या केंद्रित लक्ष आणि विभाजित लक्ष देण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊन, प्रतिसादाचा वेग सुमारे ५६% आणि अचूकता सुमारे १०% कमी होतो.
रबर आणि काँक्रीटची विलक्षण जोडी, भक्कम आणि टिकाऊ बांधकामासाठी महत्वाची कशी आहे यावर एक सूक्ष्म दृष्टिक्षेप.
व्यावसायिक वापरातील बहुतांश प्रकारच्या प्लॅस्टिकचे विघटन होऊन त्यापासून मायक्रो व नॅनो प्लॅस्टिक कण तयार होण्याच्या प्रक्रियेबाबत अधिक माहिती देणारा अभ्यास आयआयटी मुंबई येथील संशोधक व त्यांच्या सहयोगी गटाने समोर आणला.
पार्किन्सन्स झालेल्या व्यक्तींमधील अस्वाभाविक रिवॉर्ड प्रोसेसिंगच्या मुळाशी असलेल्या यंत्रणेचा डेटा आधारित अभ्यास.