जैवसामग्री एकजीव नसल्यामुळे त्यात तयार झालेले ताण क्षेत्र (स्ट्रेन फील्ड) पेशींची पंक्तीरचना कशा प्रकारे प्रभावित करते याचे आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी केलेले संशोधन निरोगी व व्याधीग्रस्त स्थितीतील आणि ऊती अभियांत्रिकीमधील पेशींचे वर्तन कसे असते यावर नवीन प्रकाश टाकते.
मंगळावरील प्राचीन नोआकियन कालखंडातील (सुमारे ४०० कोटी वर्षांपूर्वी ) उष्ण-आर्द्र हवामान हळूहळू बदलत जाऊन हेस्पेरियन कालखंडापर्यंत (सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी) शीत व हिमाच्छादित बनले असे तेथील दऱ्यांच्या प्रदेशातील नव्या पुराव्यानुसार सिद्ध झाले.
Mumbai/