अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Health

New Delhi

गर्भारपणात होणाऱ्या वायू प्रदूषणाचा अकाली प्रसूती आणि कमी वजन असलेल्या बाळाच्या जन्माशी थेट संबंध असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. हा धोका संपूर्ण भारतात असून, उत्तर भागांमध्ये अधिक आहे.

मुंबई

कोलाजेनमुळे स्वादुपिंडात संप्रेरकांच्या गुठळ्या होण्याचा वेग वाढतो, हे यापूर्वी माहित नसलेले मधुमेहाचे कारण उघडकीस आणून आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी नवीन संभाव्य औषधनिर्मितीचा वेध घेतला.

Mumbai

तिरक्या पृष्ठभागावरील वाळलेले रक्ताचे थेंब व त्यातील भेगा अभ्यासून थेंब किती वेगाने व कुठल्या कोनात आदळला यासारखी माहिती मिळवली जाऊ शकते असे आयआयटी मुंबई येथील संशोधनात आढळले.

Mumbai

जैवसामग्री एकजीव नसल्यामुळे त्यात तयार झालेले ताण क्षेत्र (स्ट्रेन फील्ड) पेशींची पंक्तीरचना कशा प्रकारे प्रभावित करते याचे आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी केलेले संशोधन निरोगी व व्याधीग्रस्त स्थितीतील आणि ऊती अभियांत्रिकीमधील पेशींचे वर्तन कसे असते यावर नवीन प्रकाश टाकते.

Mumbai

कार्य-आधारित चाचण्यांमधून असे दिसून येते की पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) मुळे महिलांच्या केंद्रित लक्ष आणि विभाजित लक्ष देण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊन, प्रतिसादाचा वेग सुमारे ५६% आणि अचूकता सुमारे १०% कमी होतो.

Mumbai

पार्किन्सन्स झालेल्या व्यक्तींमधील अस्वाभाविक रिवॉर्ड प्रोसेसिंगच्या मुळाशी असलेल्या यंत्रणेचा डेटा आधारित अभ्यास.

Mumbai

क्तदाबातील चढ-उतार कमी करण्यासाठी व रक्तप्रवाह स्थिर करण्यासाठी चुंबकीय बल उपयुक्त. हृदयविकारांच्या प्रगत उपचार पद्धतींसाठी होणार मदत

Mumbai

‘मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क’ मध्ये तांबे वापरून बनवलेला नवीन किफायती संवेदक पाण्याचा दर्जा तपासण्याच्या सर्वोत्तम पद्धती इतकाच प्रभावी

Mumbai

आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी शॉकवेव्ह-आधारित सुई-विरहित सिरिंज विकसित केली ज्यामुळे शरीरात वेदनारहित आणि सुरक्षितपणे औषध वितरण होऊन त्वचेला होणारी इजा आणि संसर्गाचे प्रमाण कमी होते.

Mumbai

एरोट्रॅक उपकरण प्रथिनाधारित बायोसेन्सरचा वापर करून पाण्यातील फेनॉल व बेनझिनसारख्या घातक प्रदूषकांची सूचना देते

Search Research Matters