अनेक अणू एकत्र येऊन रेणू तयार होताना अणूंची त्या रेणूमधली मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने होऊन त्याच्या वेगळ्या रचना तयार होऊ शकतात. अश्या रचनांना समसूत्री(आयसोमर/isomer) म्हणतात. काही समसूत्रींतील अणूंच्या रचना एकमेकांचे आरशातले प्रतिबिंब असतात. जसे दोन हात एकमेकांवर ठेवल्यास तंतोतंत जुळत नाहीत, तश्याच ह्या रचना एकमेकांवर ठेवल्यास जुळत नाहीत. अशा रेणूंना हस्तसम (कायरल/ chiral) रेणू म्हणतात. हस्तसम रेणूची एक रचना औषधी असू शकते तर दुसरी शरीराला हानिकारक. पेनिसिलिनचा रेणू याचे उत्तम उदाहरण आहे.
Deep-dive
पेशीच्या आतमध्ये आणि रक्तप्रवाहात मेद वाहून नेणारे काही विशिष्ट रेणू नवीन संशोधनातून पुढे आले आहेत.
फळबागांसाठी बांधलेल्या आणि प्लॅस्टिक लावलेल्या शेततळ्यांच्या सामाजिक परिणामाचा आढावा
अत्याधुनिक पद्धतीने शरीरात औषध वितरण करणाऱ्या तंत्रज्ञानाचा व्यापक आढावा
वेगाने बदलणार्या क्षीण चुंबकीय क्षेत्राच्या प्रतिमा तयार करण्यासाठी हिऱ्यामधील पुंज दोषांचा वापर
अतिसूक्ष्म प्लॅस्टिक प्रदूषक कणांचे अस्तित्व तपासण्यासाठी मायक्रोवेव्ह्सचा वापर करणारी नवी पद्धत संशोधकांनी शोधली
संस्कृती मंत्रालय आणि आयआयटी मुंबई यांच्या सहकार्यातून भारतीय संस्कृती, ज्ञान, कला आणि इतिहासाचा अद्वितीय खजिना डिजिटल स्वरूपात पाहता येत आहे
संशोधकांनी ग्राफीन आणि अल्फा मॉलिब्डेनम ट्रायऑक्साइडच्या मिश्रणाचा वापर करून व्होल्टेज नियंत्रित क्वांटम सर्किट तयार करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे.
जखम लवकर भरून येण्यासाठी नैसर्गिक औषधे आणि पॉलिमरच्या द्विस्तरीय रचनेतून त्वचेवर चिकटवता येईल असा पॅच संशोधकांनी तयार केला
पुंज (क्वांटम) पदार्थ आधारित वॅलीट्रॉनिक्स उपकरणांसाठी सध्याचे उत्पादन तंत्रज्ञान उपयोगात आणू शकणारी नवीन रचना