२०२१ च्या सरतेशेवटी मागे वळून बघताना असे दिसून येते की आपल्या सर्वांना अनेक बऱ्या-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. जग वैश्विक महामारीचा सामना करायला शिकत असताना एक शाश्वत आधार कायम होता आणि राहील. तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. अनेक आघाड्यांवर विज्ञानाची आगेकूच कायम राहिली.आपल्यासाठी रीसर्च मॅटर्स अनेक भारतीय भाषांमध्ये पर्यावरणाचे भान, सामाजिक प्रगती, ऊर्जा, अभियांत्रिकी, सुरक्षा, इलेक्ट्रॉनिक्स मधील नवीन संशोधन आणि बरेच काही या वर्षी घेऊन आले होते. तुम्ही वाचकांनी आम्हाला भरभरून साथ दिली याचा आम्हाला आनंद वाटतो.
Technology
पुनःप्रभारित होऊ शकणाऱ्या अत्याधुनिक विद्युत बॅटरी निर्मिती क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल प्रा. अमर्त्य मुखोपाध्याय यांना स्वर्णजयंती सन्मान्य सदस्यत्व - २०२१ प्रदान करण्यात आले.
संवेदक-द्रव आंतरपृष्ठावरील विद्युतभाराचा प्रभाव लक्षात घेणारे जैवसंवेदकाचे नवीन संगणकीय प्रतिमान
3-डी प्रिंटिंग मध्ये सुधारणा करण्यासाठी संशोधकांचा भूमिती आणि समदिकता यांतील संबंधाचा अभ्यास
आय सी चिप्स, फोटोव्होल्कटेईक सेल्स (प्रकाशविद्युत घट) आणि गॅस टर्बाईन्स प्रभावीपणे थंड ठेवण्यासाठी संशोधकांनी लघुप्रणालींच्या उष्मागतिकीतील गणितीय विश्लेषणाचा वापर केला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक नवीन अल्गोरिदम वापरून बिनतारी संदेशवहन यंत्रणेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यात संशोधकांना यश
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी सिक्कीममधील अती उंचीवरील ठिकाणी हायब्रिड स्टोरेज सिस्टीम असलेल्या सौर मायक्रोग्रिड्सची स्थापना केली.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या संशोधकांनी अन्न आणि पाण्यातील प्रतिजैविकांची पातळी मोजण्यासाठी एक साधा सोपा आणि अभिनव संवेदक विकसित केला आहे.
पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि दूषित पाण्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी भारतातील सांडपाणी प्रक्रियेच्या पायाभूत सुविधांमध्ये पद्धतशीर बदल करण्याचा नव्या अभ्यासाद्वारे प्रस्ताव
मेमरी आणि संगणकीय क्रिया एकत्र करण्यासाठी संशोधकांनी शोधला नवा मार्ग