अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Health

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी बॉम्बे) आणि युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंघम,युके येथील संशोधकांना मूत्रमार्गाचे असंतुलन (मूत्रविकार) असणाऱ्या लोकांच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल अशी अशा आहे. 

मुंबई

आयआयटी, मुंबई व सीएसआयआर-एनसीएल, पुणे येथील संशोधकांनी कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी सुवर्ण-लिपोसोम नॅनोहायब्रिड्स तयार केले आहेत 

मुंबई

कर्करोगाच्या पेशींपर्यंत औषध पोहोचवण्यासाठी आयआयटी मुंबई येथील संशोधकांनी प्रथिने असलेला वाहक तयार केला आहे. 

पुणे

शहरातील प्रदूषणाबाबत बातम्या सतत येत असतात, पण आपल्या घरातल्या तेवढ्याच धोकादायक प्रदूषणाकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. चुलीवर स्वयंपाक, धूम्रपान, केरोसीनच्या शेगड्यांचा वापर इ. क्रियांमुळे घरात प्रदूषण होते. जॉन हॉप्किन्स स्कूल ऑफ मेडिसिन, यूएसए आणि बायरमजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (बी. जे. मेडिकल कॉलेज), पुणे येथील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात घरातील वायू प्रदूषणाचा क्षयरोगावर काय परिणाम होतो हे समजून घेण्याचा  प्रयत्न केला आहे.

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी शरीरात इन्सुलिन निर्माण करण्यासाठी जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित केले 

पावसाळा सुरु झाला आहे, आणि पश्चिम घाटांच्या हिरव्या टेकड्यांमध्ये बेडकांचा डराव डराव आवाज भरून राहिला आहे! हे बेडूक पावसात मजेत वेळ घालवतायत असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुमचा हा समज चुकीचा असू शकेल! आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची एखादी भीषण लढाई ते लढत असण्याची दाट शक्यता आहे. त्यांचा शत्रू कोणी शिकारी नाही, तर बॅट्रॅकोकायट्रिम डेंडरोबॅटीडिस  उर्फ बी.डी.  नावाची बुरशी आहे. हे रोगजंतू जगभरातील उभयचरांना त्रास देतात आणि प्राणघातक अश्या कायट्रिडिओमायकोसिस  नावाच्या बुरशी-संसर्गास कारणीभूत ठरतात.

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी ग्रामीण भागात वापरण्यासाठी कमी खर्चाचे, सोप्या पद्धतीने देखरेख करता येण्यासारखे आर्सेनिक गाळण्याचे संयंत्र विकसित केले आहे.

मुंबई

रुग्णाच्या आरोग्याच्या निर्देशक असलेल्या ईसीजी आणि ईईजीसारख्या चाचण्यांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी शास्त्रज्ञांनी कमी उर्जेवर चालणाऱ्या, कमी किंमतीच्या आणि अंगावर बाळगता येईल अशा बिनतारी उपकरणाची रचना केली आहे.  

मुंबई

संशोधकांनी असे वाहक विकसित केले आहे जे अल्ट्रासाऊंडच्या मदतीने अधिक प्रभावीपणे औषध पोहचवू शकते.

मुंबई

पदार्थांचे रेणू ओळखण्यासाठी आय आय टी मुंबई च्या शास्त्रज्ञांनी विकसित केली नवीन पद्धत 

Search Research Matters